LALBAUGCHA RAJA 2026 FIRST LOOK saam tv
Video

लालबागचा राजाची पहिली झलक साम टीव्हीवर, पाहा व्हिडिओ

Lalbaugcha Raja 2026 First Look And First Darshan Video: मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाची 2026 गणेशोत्सवासाठी पहिली झलक जाहीर झाली. तिरुपती बालाजी आणि महाकाल मंदिराच्या संकल्पनेवर आधारित देखावा पाहा आणि बाप्पाचे पहिले दर्शन घ्या.

Omkar Sonawane

मुंबईकरांचे आणि जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या करोडे गणेशभक्तांची 'लालबागचा राजा'च्या पहिल्या दर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी आज (शुक्रवार, 11 सप्टेंबर) ला सायंकाळी 7 वाजता लालबागचा राजाची पहिली झलक अधिकृतपणे जाहीर केली. परळ येथील लालबाग मार्केट परिसरातील मंडपात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बाप्पाचे मुखदर्शन घडवण्यात आले. यावेळी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी गर्दी केली होती.

तिरुपती बालाजी, महाकाल मंदिरावर आधारित देखावा

यंदाच्या लालबागच्या राजाचा देखावा तिरुपती बालाजी आणि उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या संकल्पनेवर आधारित आहे. बाप्पाच्या मूर्तीवर यंदा विशेष धार्मिक अलंकार करण्यात आले आहेत. गणेशराजाच्या कपाळावर त्रिशूल असून गळ्यात मोठा पट्टा घालण्यात आला आहे. या पट्ट्यावरही त्रिशूल आणि डमरूची आकर्षक नक्षी करण्यात आली आहे. त्यामुळे लालबागच्या राजाचे रूप अधिकच भव्य आणि आकर्षक दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठिय्या मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी, 550 अधिकाऱ्यांची मूळ विभागात रवानगी

Kapurche Pani: १ तुकडा कापूर पाण्यास मिसळून आंघोळ केल्याने काय होते?

पुण्याच्या बुधवार पेठेत तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई! एकच खळबळ

परवानगी दिली नाही तरी मुंबईला जाणारच, जरांगेंचा निर्धार, आंदोलक मुंबईत धडकणार

MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासलं, MPSC विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक

SCROLL FOR NEXT