Supriya Sule News SaamTv
Video

Ladki Bahin Yojana : अपात्र बहिणींचे पैसे घेण्यास सुरुवात; सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया | VIDEO

Supriya Sule Statement : लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नसलेल्या बहिणींवर कारवाई होणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. धुळ्यातील एका महिलेचे पैसे देखील पुन्हा सरकार जमा झाले आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर येत आहे. जर निकष डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा लाडक्या बहिणींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. अशा महिलांना मिळालेले पैसे पुन्हा सरकार जमा होण्याची शक्यता आहे. याची अंमलबजावणी होण्यास सुरुवात झाली आहे. एका महिलेकडून ५ महिन्याचे ७ हजार ५०० रुपये परत घेण्यात आले आहेत. धुळे जिल्ह्यातल्या नकाने गावातील एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीतून निष्पन्न झालं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे ५ महिन्याचे मिळालेले पैसे तिला परत देण्यास सांगितले आहेत.

महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या पडताळणीचा निर्णय घेण्यात आला आहे. यात निकषात न बसणाऱ्या अपात्र महिलांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. अशा अपात्र बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार आहेत. धुळ्यातल्या एका महिलेचे पैसे सरकारजमा झाले आहेत. योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थी महिलांवर कठोर कारवाई होणार आहे. धुळे, जळगाव, पालघर, गडचिरोलीमध्ये सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. केशरी आणि पिवळे शिधापत्रिकाधारक वगळता सर्व अर्जांची छाननी होणार आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी अगोदर बोलले होते. कालही हेच सांगत होते. हे अपेक्षित होतं. हे सातत्याने बोलत होते, सरकार आल आहे, मला आरोप करायचे नाहीत. फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत. महत्वाच्या पदावर बसले आहेत, टीका करण्यासाठी बसले नाहीत, एक राज्याचा पिक्सल डिपॉझिट रिपोर्ट पहा, कधी तरी पॉलिसीवर बोलल पाहिजे, राज्य केंद्र याच नात पाहिलं, मी डेटा देईल, डीपीडीसीचे पैसे वळवले जात आहेत. महिलांची फसवणून तुमच्या प्रश्नांत उत्तर आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT