Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin: लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार? नोकरी आणि गाडी असणारे होतील अपात्र

Ladki Bahini Scheme Applications : बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. काही लाभार्थी बहिणींचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. याबाबत बाल कल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींची छाननी होण्याची चर्चा रंगली होती. मात्र आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी सरकारची भूमिका स्पष्ट केलीय. आता कोणत्या महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहेत? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

विधानसभेत महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली.. या योजनेचा गैरफायदाही घेतल्याचं समोर आलं. त्यामुळे लाडक्या बहीणींची चौकशी होऊन त्यांना योजनेतून वगळण्याच्या चर्चेने जोर धरलाय. मात्र महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी शासन निर्णयावर बोट ठेवत चर्चांना पुर्णविराम दिलाय. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नसले तरी ते कठोर करण्याचे संकेत तटकरेंनी दिलेत. त्यासाठी त्यांनी मूळ शासननिर्णयाचा संदर्भ दिलाय.. मात्र या मूळ शासन निर्णयानुसार कोण अपात्र ठरणार? पाहूयात.

कोण ठरणार अपात्र?

अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अपात्र ठरणार

ट्रॅक्टर वगळता दुसरं चारचाकी वाहन असल्यास ठरणार अपात्र

ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात, त्यांना लाभ मिळणार नाही

कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला असल्यास अपात्र ठरणार

कुटुंबातील सदस्य आमदार, खासदार असल्यास लाभ नाही

कुटुंबाची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरणार

लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 6 हप्त्यांचे 9 हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा झालेत.. आतापर्यंत या अर्जांची काटेकोर तपासणी झाली नव्हती.. मात्र आता नोकरी आणि चारचाकी गाडी असलेल्या लाडक्या बहीणींना लाभापासून वंचित रहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT