Ladki Bahin Yojana SaamTv
Video

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांवर टांगती तलवार? मोठी अपडेट आली समोर | Video

Mahayuti Government Schemes : लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार येत असल्याने महायुती सरकारकडून इतर काही योजना बंद करण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Saam Tv

लाडकी बहीण योजनेमुळे सरकार काही योजना बंद करण्याच्या विचारात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यात शिवभोजन थाळी देखील बंद करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तसंच आमदारांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या बजेट बॅगचा आदेश देखील आता रद्द करण्यात आलेला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळी ही लोकप्रिय ठरली. या योजनेत केवळ १० रुपयात प्रत्येकाला जेवण देण्यात येतं. मात्र आता ही योजना बंद करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. शिवभोजनच्या रोज २ लाख थाळींसाठी वार्षिक २६७ कोटींचा खर्च येतो. त्यामुळे तिजोरीवर भार वाढत आहे, असल्याचं बोललं जात आहे.

तर दुसरीकडे आमदारांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या बजेट बॅगचा देखील आदेश आता रद्द करण्यात आलेला आहे. विधानमंडळ सदस्य आणि इतरांना देखील ही बॅग वाटली जाणार होती. ८८६ हार्ड टॉप, ४ चाकी बॅग खरेदीचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यासाठी महायुती सरकारने बजेटमध्ये ८२ लाखांचा अंदाजित खर्च देखील ठरवलेला होता. मात्र आता हा निर्णय रद्द करण्यात आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT