Maharashtra Live News Update : राज्यात आज ५ दसरा मेळावे! ठाकरे-शिंदेंच्या भाषणांकडे सर्वांच्या नजरा; जरांगे काय बोलणार?

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरूवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२५, दसरा उत्सव, उद्धव ठाकरे आणि शिंदेंचा मुंबईत दसरा मेळावा; पंकजा मुंडे मनोज जरांगे पाटील यांचा बीडमध्ये दसरा मेळावा, महाराष्ट्रात पाऊस विश्रांती, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Gandhi Jayanti : सेवाग्राम आश्रमात रामधूनने गांधी जयंतीला सुरवात

सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त सकाळी ५.४५ वाजता रामधून गाण्यात आलीय.ही रामधून नई तालीम येथील घंटाघर पासून तर बापू कुटी पर्यंत होती. यात आश्रमतील गांधींवाद्याचा समावेश होता.त्यानंतर बापूकुटी परिसरात प्रार्थना करण्यात आलीय.गांधींवाद्यानी सकाळी ६.३५ ते ७.३० यावेळेत सामूहिक श्रमदान केले.आज महात्मा गांधी यांची जयंती असल्याने आश्रमात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.

Dasara 2025 Live update : साईबाबा पुण्यतिथी आणि दसरा उत्सवाचा आज मुख्य दिवस.. आज साईमंदिर राहणार रात्रभर दर्शनासाठी खुले

शिर्डीत साईबाबांच्या 107 व्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस असून या उत्सवाचा मोठा उत्साह बघायला मिळतोय.. उत्सवानिमित्त साई संस्थानकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज साईमंदिर भक्तांना दर्शनासाठी राहणार रात्रभर खुले राहणार आहे.. साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले असून साई नामाच्या जयघोषाने साई नगरी दुमदुमली आहे.. थोड्यावेळाने शिर्डीत भिक्षा झोळीचा कार्यक्रम संपन्न होणार असून साई संस्थानचे अधिकारी, साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थ या सोहळ्यात सहभागी होतील.. साईं मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे..

Pankja munde dasara melava Live : बीडच्या सावरगाव घाट मध्ये भगवान भक्ती गडावर मंत्री पंकजा मुंडे यांचा आज दसरा मेळावा

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी भगवानगडावर सुरू केलेला दसरा मेळावा कालांतराने या मेळाव्याचे सूत्र पंकजा मुंडे यांच्याकडे आली आज रोजी बीडच्या सावरगाव घाट राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमी मध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 10 वा दसरा मेळावा होत आहे गतवर्षी याच मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर आले होते तर लक्ष्मण हाके देखील या मेळाव्यास उपस्थित राहिले होते मात्र या वेळेच्या मेळाव्यास दोन्ही बहिण भाऊ एकत्र येतात का याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले असून सावरगाव घाट येथील मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे

दसरा सणानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजया दशमीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सजावटी मुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे‌.

देवाचे प्रवेशद्वार,चौखांबी,सोळखंबी संत नामदेव पायरी,सभा मंडप आदी ठिकाणी झेंडू, अष्टर, शेवंती, गुलाब, ॲार्कीड, अॅांथोरियम, सुर्यफूल, ब्लु डेजी, पिंक डेजी, कमिनी, अशोकाची पाने, जिप्सो, मनीप्लांट, ड्रेसिना. इत्यादी फुलांचा व पानांचा वापर केला आहे. ही सजावट पुणे येथील भाविक राम जांभूळकर यांनी केली आहे

Maharashtra Live News Update : राज्यात आज ५ दसरा मेळावे! ठाकरे-शिंदेंच्या भाषणांकडे सर्वांच्या नजरा; जरांगे काय बोलणार?

महाराष्ट्रात आज पाच दसरा मेळावे होणार आहेत. संघाचा दसरा मेळावा नागपूरमध्ये होणार आहे. संघाला १०० वर्षे पुर्ण झाली आहेत, भाषणात मोहन भागवत काय बोलणार? याची उत्सुकता लागली. पंकजा मुंबई आणि मनोज जरांगे पाटील यांचा बीडमध्ये दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षणसाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलेय, मनोज जरांगे पाटील काय बोलणार? याकडे मराठा समाजाचे लक्ष लागलेय. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा मुंबईत होणार आहे. शिंदे अन् ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विजयादशमीच्या सणाकडून प्रेरणा घेऊन आव्हानांवर, संकटावर मात करण्याची हिंमत बाळगुया, असे आवाहन करतानाच, विजयादशमीचे हे पर्व राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्याही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन यांच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा देतानाच, राज्यात पावसामुळे अनेक भागात अभूतपुर्व बिकट परिस्थिती उद्भवली आहे. या संकटसमयी आपण सगळे एकजुटीने या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहूया. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी योगदान देऊया. या बांधवांना पुन्हा नव्याने उमेदीने करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन केले आहे.

‘विजयादशमीचा सण हा असत्यावर सत्याचा विजयाचा संदेश घेऊन येतो. या सणाकडून सकारात्मक अशी ऊर्जा घेऊया. बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून मार्ग काढण्यात महाराष्ट्र नेहमीच पुढे राहीला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते अनेक अग्रणींनी आपल्याला हाच वारसा-वसा दिला आहे. ही प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी सज्ज होऊया. आपल्या सर्वांच्या एकजूटीतून महाराष्ट्र विकासाची पताका डौलाने फडकत ठेवण्यासाठी निर्धार करूया, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी संदेशात म्हटले आहे.

८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

२९ सप्टेंबर पासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघ गर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

७ ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल, आणि सुमारे ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com