Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana : एकत्र ₹३००० का नाहीत? लाडक्या बहि‍णींचा संताप, थेट महामार्ग रोखला, पाहा व्हिडिओ

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे मानधन एकत्र मिळाले नाही म्हणून भंडाऱ्यात महिलांनी मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग रोखला. नागपूर नाक्याजवळ ठिय्या आंदोलन करत महिलांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana Bhandara protest latest news : भंडाऱ्यात लाडक्या बहिणींनी मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवलाय. लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचं मानधन एकाचवेळी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र, आता निवडणूक आटोपल्यानंतरही लाडक्या बहिणींना मानधन मिळालेलं नाहीये. त्यामुळं लाडकींनी महामार्ग आडवत संताप व्यक्त केलाय. मागील दोन महिन्यांचं मानधन नं मिळाल्यानं आणि काही महिलांचं नावं यादीतून वगळल्यानं भंडाऱ्यात महिलांनी एकत्र येत मुंबई - कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केलं. यामुळं महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाल्यानं वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्याय...

लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचं मानधन एकाचवेळी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र, आता निवडणूक आटोपल्यानंततरी लाडक्या बहिणींना मानधन मिळालेलं नाही. त्यामुळं भंडाऱ्यात महिलांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात रोष बघायला मिळालं आहे. मागील दोन महिन्यांचं मानधन नं मिळाल्यानं आणि काही महिलांचं नावं यादीतून वगळल्यानं भंडाऱ्यात महिलांनी एकत्र येत मुंबई - कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केलं. भंडारा शहरातील नागपूर नाका इथं या महिलांनी रस्त्यावर उतरतं ठिय्या आंदोलन करून हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. यामुळं महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाल्यानं वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्यात. महिलांच्या या आक्रमक पवित्रामुळं पोलिस प्रशासनाची चांगलीच दमछाक उडाली. प्रशासनानं समजूत काढल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर खोळंबलेली वाहतूक काही काळानंतर सुरू झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tighee Movie: आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा; सोनाली कुलकर्णीच्या 'तिघी' चित्रपटाचा इमोशनल टीझर प्रदर्शित

Indian Railways: रेल्वेच्या नियमात मोठे बदल! किलोमीटरप्रमाणे लागणार भाडे, 200 किमीच्या प्रवासाठी मोजावे लागतील 150 रुपये

Pune Result: नातीगोती- महिला राज, सर्वाधिक मताधिक्य; तर कुठे शहराध्यक्षांचे पराभव, पुणे महापालिकेच्या निकालाचे A टू Z अपडेट्स

Zinga Masala Recipe: रविवारी घरीच बनवा हॉटेलसारखा झणझणीत झिंगा मसाला, सोपी आहे रेसिपी

Govinda Affair: 'मी त्याला माफ करणार नाही...' गोविंदाच्या अफेअरवर पत्नीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली ६३ वर्षे...

SCROLL FOR NEXT