नवरात्रीच्या सातव्या माळीच्या दिवशी कोलकाता येथे एक मोठी दुर्घटना घडलीय. दुर्गा पुजेचा मंडप कोसळल्यानं १७ जणांचा मृत्यू झालाय. कोलकातामधील 'चोरबागन सार्वजनीन दुर्गा पूजा' मंडपाचा काही भाग कोसळला.मंडप कोसळल्यानंतर तिथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झालाय. सातवी माळ असल्यानं दुर्गा पूजेसाठी भाविकांनी येथे मोठी गर्दी केली होती, त्यानंतर तिथे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.
या घटनेत बाधित झालेल्या व्यक्तींची सुटका करून त्यांना उपचारासाठी कलकत्ता मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले आहे. पूजा आयोजकांनी त्वरित पावले उचलून परिस्थिती हाताळण्यासाठी आणि बाधित व्यक्तींना मदत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जखमी व्यक्तींची संख्या आणि इमारत कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.