kolhapur vadange village shiv jayanti controversy obscene dance  
Video

Kolhapur News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लील डान्स|Video Viral

Obscene Dance शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला वडणगेत पुतळ्यासमोर अश्लील नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वडणगे ग्रामपंचायतीकडून महापुरुषांचा अवमान झाल्याचा आरोप शिवप्रेमींकडून केला जातोय.

Bharat Jadhav

कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे गावात एक संतापजनक घटना घडली आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर स्टेज उभारत तेथे अश्लील नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या अश्लील डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. आज शिवजयंतीचा उत्सव असताना आणि गावात महाशिवरात्रीनिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. या काळात भजन, कीर्तन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, असा अश्लील डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय. प्रकारचा नृत्य कार्यक्रम का ठेवला, असा सवाल शिवप्रेमींकडून उपस्थित केला जातोय. या आधीही बेकायदा बैलगाडी शर्यती प्रकरणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वडणगे ग्रामपंचायतीकडून महापुरुषांचा अवमान झाल्याचा आरोप शिवप्रेमींनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून असा कार्यक्रम घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल ग्रामस्थांकडून केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळंल

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT