Police escort the accused in the Kolhapur exploitation case as public outrage grows and even his father demands strict punishment. saam tv
Video

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवले; मुलाला फाशी द्या! संतापलेल्या बापाची मागणी|VIDEO

Kolhapur Shiroli Love Trap Sexual Abuse Case Details: कोल्हापूरच्या शिरोली पुलाची येथे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 15 हून अधिक तरुणींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Omkar Sonawane

अमरावती परतवाड्यातील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता कोल्हापूरच्या शिरोली पुलाची परिसरात एक संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. आरोपी शाहीद सनदीनं सोशल मीडियाद्वारे 15 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांच्यावर अत्याचार केलाय. आरोपी शाहीद सनदीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या घटनेत लव्ह जिहादचा संशय हिंदू संघटनांनी व्यक्त केलाय.

आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या नराधमावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज शिरोली पुलाची गावात कडकडीत बंद पाळण्यात आलाय. दरम्यान आपल्या मुलाने केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त करत, त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भातील व्हिडिओ त्यांनी गावातील ग्रुपवर पाठवला. आम्ही सनदी परिवार कधीच अशा चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

Maharashtra Politics: रायगड-नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला, या २ नेत्यांवर जबाबदारी, कुणाला बसला धक्का?

Shravan Somvar : श्रावण सोमवारचा उपवास 'या' लोकांनी चुकूनही करू नका, फायद्याऐवजी होईल गंभीर नुकसान

पृथ्वीवर नागांचा जन्म कसा झाला? नागपंचमीच्या निमित्ताने जाणून घ्या पौराणिक कथा

Gopinath Munde: गोपीनाथ मुंडेंची भाजपमध्ये होणारी घुसमट मी जवळून पाहिली, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT