Kolhapur Viral Video Saam Tv
Video

Kolhapur News : वसुली करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना चोपलं, लाकडाच्या दांडक्याने भररस्त्यात मारहाण; Viral Video

Kolhapur Viral Video : कोल्हापूरमधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वसुली करण्यासाठी आलेल्या बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना चोप दिल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते.

Yash Shirke

कोल्हापूरमध्ये एका सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना बेदम चोप देण्यात आला आहे. वसुली अधिकारी आणि बँकेचे कर्मचारी यांना चोप देतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. रेंदाळ येथे वसुली करण्यासाठी आलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांना चोप देण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सदस्यांनी या अधिकाऱ्यांना मार दिला आहे. सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी काही वसुली अधिकारी आणि बँकेचे कर्मचारी रेंदाळमध्ये पोहोचले होते. तेव्हा महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सदस्यांनी त्यांचीशी वाद घातला. शाब्दिक वादानंतर त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना मारायला सुरुवात केली. लोकाधिकार समितीच्या सदस्यांकडे लाकडाच्या दांडक्याने या अधिकाऱ्यांनी चोपले. घटनास्थळीहून पळ काढणाऱ्यांनाही त्यांनी पकडून पकडून मार दिला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आला. कोल्हापूरमधला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

SCROLL FOR NEXT