Eknath Shinde News SaamTv
Video

Kolhapur News Update : कॉंग्रेसला आणखी एक धक्का; कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधवांचा शिंदे गटात प्रवेश

Congress News : महायुतीकडून कॉंग्रेसला आज दोन धक्के बसले आहेत. रवी राजा यांच्या भाजप प्रवेशानंतर आता कोल्हापूर उत्तरच्या कॉंग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात एकनाथ शिंदे यांनी कॉंग्रेसला कोल्हापूर उत्तरमधून मोठा धक्का दिला आहे. कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. कॉंग्रेसने विधानसभेला तिकीट नाकारल्याने त्या नाराज होत्या. त्यांनंतर त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षातील नाराजांकडून सध्या बंडखोरी केली जात आहे. तर काही ठिकाणी तिकीट न मिळाल्याने पक्ष बदल देखील केला जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नेमकं कोणाचं पारडं जड होईल याचा अंदाज बांधणं अवघड जात आहे. अशातच आज महायुतीकडून कॉंग्रेसला धक्का बसला आहे. एकीकडे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर उत्तरमध्ये कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पावेश केला आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये देखील कॉंग्रेसला विधानसभेला फटका बसणार आहे. कोल्हापूर उत्तरमधून शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर हे उमेदवार आहेत. आता जयश्री जाधव यांच्या बंडखोरीमुळे त्यांना विधानसभेत चांगलाच फायदा होणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT