रणजीत माजगावकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' करा अशी मागणी होत आहे.
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा वाद पेटण्याचा शक्यता आहे. हिंदू जनजागृती समितीने विद्यापीठाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. विद्यापीठाच्या नावामुळे शिवाजी असा एकेरी उल्लेख होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यावर या समितीने विरोध दर्शवला आहे. समितीच्या सदस्यांनी कोल्हापूरच्या या विद्यापीठाचे नाव नामांतर करण्याची मागणी केली आहे. विद्यापीठाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' करा असे त्यांनी म्हटले आहे. हिंदू जनजागृती समितीने कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन केले आहे. आंदोलनकर्त्यांनी विद्यापीठाचे नाव बदलण्यासंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली आहे. नामांतराच्या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.