Kolhapur Municipal Corporation announces strict rules for aggressive dog breeds to ensure public safety. Saam Tv
Video

पाळीव कुत्र्यांच्या मालकांनो सावधान! हे नियम मोडले तर थेट कुत्राच होणार जप्त|VIDEO

Pitbull, German Shepherd, Rottweiler Restrictions By KMC: कोल्हापूर महापालिकेने पाळीव कुत्र्यांच्या मालकांसाठी नवे आदेश जारी केले आहेत. विशेषतः पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमन व रोटविलर जातींवर कठोर नियम लागू करण्यात आले असून, चेन व मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत.

Omkar Sonawane

कोल्हापूर महापालिकेचे पाळीव कुत्र्यांसाठी नवे आदेश

पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमन, रोटविलर यांच्यासाठी कठोर नियम

चेन व मास्क अनिवार्य, नियम मोडल्यास थेट कारवाई

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार

कोल्हापूर : शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असतानाच कोल्हापूर महानगरपालिकेने पाळीव कुत्र्यांच्या मालकांवर लक्ष केंद्रित करत महत्त्वाचे आदेश जाहीर केले आहेत. विशेषतः पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमन आणि रोटविलर यांसारख्या आक्रमक जातींच्या कुत्र्यांसाठी हे नियम लागू राहणार आहेत.

महापालिकेच्या आदेशानुसार :

पाळीव कुत्र्यांना बाहेर नेताना चेन किंवा बेल्टने बांधणे अनिवार्य असेल.

आक्रमक प्रवृत्तीच्या कुत्र्यांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असेल.

नियमांचे उल्लंघन झाल्यास महानगरपालिका थेट कुत्रा जप्त करणार असून, संबंधित मालकावरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

या आदेशामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक ठिकाणी होणारा त्रास कमी करण्यास मदत होईल, असा महापालिकेनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BSNL चा धमाका! अनलिमिटेड कॉलिंग अन् १०० जीबी डेटा; विद्यार्थांसाठी आणला नवा प्लॅन

Shocking : क्षणात सर्व काही संपलं! सौदी अरेबियातील भीषण अपघात एकाच कुटुंबातील १८ लोकांचा मृत्यू

Income Tax Refund: करदात्यांसाठी बातमी, कर परतावा कधी मिळणार, आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics: चंद्रपुरात भाजपसोबत मोठा गेम,४ नगरपरिषदांमध्ये पक्षात्तर करत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधातच बंडखोरी

Supreme Court :...तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करू; निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT