Kolhapur Rain Saam Tv
Video

Kolhapur Rain: कोल्हापुरात मुसळधार, ५ बंधारे पाण्याखालीच, गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप|VIDEO

Kolhapur Rain News: कोल्हापूरात गेले पाच दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. कोल्हापूरात पावसामुळे पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Siddhi Hande

राज्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगलीला पावसाने अशरक्षः झोडपून काढले आहे. कोल्पूरात तर अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेले पाच दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.राजाराम बंधाऱ्यासह रुई, इचलकरंजी, येवलुज, शिरोळ हे बंधारे पाण्याखाली आहेत. राजाराम बंधारा इथं पाणी पातळी 17 फुटांवर आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील गांधी मैदानाचं झालं रूपांतर तळ्यात झालं आहे.कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे गांधी मैदान पाण्याने काठोकाठ भरले आहे.कोल्हापूरातील पावसामुळे शेतीतदेखील पाणी घुसले आहे. यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूरात अजूनही पावसाची संततधार सुरु आहे. (Kolhapur Rain Alert)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Delhi : CNG पंपावर मोठा स्फोट, तिघांचा मृत्यू; गॅस भरताना टाकी फुटल्यानं परिसरात खळबळ

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

SCROLL FOR NEXT