काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची चांगलीच चर्चा रंगली होती. या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने सर्वाधिक १३ जागा जिंकल्या, तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या पॅनेलला १२ जागा मिळाल्या. त्यामुळे गोकुळमध्ये सत्तेची चुरस पाहायला मिळाली.
आता पुन्हा एकदा गोकुळच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीचे गोकुळ संचालक पुन्हा एकदा सहलीवर निघाले आहेत. कोल्हापूर विमानतळावरून हे संचालक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर ते राज्यातील प्रमुख नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर सर्व संचालक अलिबागला जाणार असून, तिथून कोकण पर्यटनाचा आनंद घेणार आहेत.
गोकुळच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा संचालकांच्या या सहलीची चर्चा रंगू लागली आहे. या सहलीमागे नेमकी काय राजकीय चर्चा होते आणि पुढील रणनीती काय असणार, याकडे आता कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.