कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे... या निवडणुकीसाठी एकूण 5 हजार 418 मतदार असून, जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील 35 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे, या प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आलीय... मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच १९ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा इथं मतमोजणी होणार आहे. गोकुळच्या सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय...
1. छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी — महायुतीचे पॅनेल. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचा समावेश आहे.
2. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी — आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल. या आघाडीला राजू शेट्टी यांच्यासह विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा आहे.
निवडणुकीतील चिन्हे :
महायुती — कपबशी
समविचारी आघाडी — शिट्टी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.