Awaj Maharashtracha Kolhapur saamtv
Video

Awaj Maharashtracha Kolhapur: 'पैसे देऊन अपंग करू नका,आमच्या सुरक्षेचं काय? विद्यार्थीनींचा सवाल

Kolhapur Corporation Election: महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर साम टीव्हीनं आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रमांतर्गत कॉलेजाच्या विद्यार्थिनींसोबत संवाद साधला. कोल्हापूरच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी राजकीय नेत्यांना प्रश्न विचार शहरातील समस्यांकडे लक्ष देण्यास सांगितलं. महिलांना पगारी योजनांची गरज आहे की सुरक्षितता, सक्षमीकरण आणि रोजगाराची गरज आहे, असा सवाल कॉलेजच्या युवतींनी केला.

Bharat Jadhav

'पैसे देऊन महिलेला अपंग करणं किंवा तिचे हात बांधणं योग्य वाटतंय का?' असा थेट सवाल कोल्हापूरच्या विद्यार्थिनींनी राजकीय नेत्यांना केला. 'लाडकी बहीण' सारख्या योजनांपेक्षा महिला सक्षमीकरण, रोजगार आणि सुरक्षितता वाढवण्यावर भर दिला पाहिजे अशी मागणीही विद्यार्थिनींनी केली. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साम टीव्हीने 'आवाज महाराष्ट्र' कार्यक्रमाच्या अंतर्गत कोल्हापूरच्या महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी गप्पा संवाद साधला. यात विद्यार्थिनींना चालू राजकीय घडामोड, पक्षाचे जाहीरनामे, राजकीय स्थितीवर प्रश्न विचारण्यात आली. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिंनी आपले रोखठोक मत मांडले. जाहीरमाना जाहीर करण्यापेक्षा ज्या कामांची आश्वसने दिले आहेत, ती पूर्ण करणं आवश्यक असतं.

अनेकवेळा जे उमेदवार आहेत, कधीच दिसत नाहीत, नागरिकांना ते माहिती पण नसतात. अशा ते कामे पूर्ण याची शंका वाटते असं काही विद्यार्थिनी म्हणाल्या. 'पैसे देऊन महिलेला अपंग करणं किंवा तिचे हात बांधणं योग्य वाटतंय का?' असा थेट सवाल करत विद्यार्थिनींनी केला. कोल्हापुरातील खराब रस्ते, कचरा समस्या, अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव यांसारख्या गंभीर नागरी समस्यांवर त्यांनी लक्ष वेधलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : कल्याण बुद्धभूमी फाऊंडेशन प्रकरण; बुद्धभूमीकडून १५ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा

खुशखबर! लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Women's T20 League: सोबो मुंबई फाल्कन्सच्या महिलांनी रचला इतिहास, पहिल्याच मुंबई लीगमध्ये शानदार विजेतेपदाचा मान

आता १८ वर्षावरील व्यक्तीला आधार कार्ड नाहीच; 'या' राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

हिमाचलमध्ये पर्यटकांची गर्दी उसळली, मनालीत 13 दिवसांत 3 लाख पर्यटक; वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT