नवी दिल्ली : कॅन्सरचं नाव जरी ऐकलं तरी पायाखालची जमीन सरकते. मात्र आता हाच जीवघेणा कॅन्सर हद्दपार करण्यासाठी जागतिक स्तरावर हालचालींना वेग आला आहे. क्वाड शिखर परिषदेत कॅन्सर मुनशॉट या कार्यक्रमांतर्गत कॅन्सरचा नायनाट करण्यासाठी पावलं उचलण्याविषयी क्वाड देशांचं एकमत झालं आहे. तर त्याची सुरुवात गर्भाशयाच्या कॅन्सरपासून करण्यात येणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे. कॅन्सर मुनशॉट कार्यक्रम काय आहे पाहूयात
कॅन्सर मुनशॉट हा क्वाड देशांचा कार्यक्रम आहे. कॅन्सरचं निदान, प्रतिबंधात्मक उपचार आणि लसीकरणावर भर आहे. पुढील 25 वर्षात 50 टक्के कॅन्सरचे मृत्यू कमी करण्याचं लक्ष आहे. कॅन्सरवर औषधं आणि उपकरणांवर संशोधन होणार आहे.
भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्या महिलांचे प्रमाण हे 9 टक्के इतकं आहे. त्यात दरवर्षी वाढ होत असल्याचं दिसून येतंय. त्यापार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर गर्भाशयाचा कॅन्सर हद्दपार करण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका एकत्र आले आहेत. त्यामुळे कॅन्सरग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.