Edible Oil Price Hike Saam TV
Video

Edible Oil Price Hike: युद्धामुळे सर्वसामान्यांच्या घरात उडाला भडका, खाद्यतेलाच्या किंमतीत १२५ रुपयांनी वाढ

edible oil price hike in India: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारताला बसत आहे. भारतात महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर पाठोपाठ आता खाद्य तेलाच्या किंमती देखील वाढल्या आहेत.

Priya More

मध्य-पूर्वेतील युद्धाचा वणवा आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. आखाती देशांमधील तणावामुळे आयात विस्कळीत झाली आहे. गेल्या १० दिवसांत खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. १५ लिटरच्या डब्यामागे तब्बल 100 ते 125 रुपयांची वाढ झाल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. सध्या बाजारात जुना स्टॉक उपलब्ध असल्याने काहीना दिलासा मिळाला आहे. तरी इराण-इस्राइलमध्ये सुरू असलेले युद्ध लांबल्यास टंचाई भासण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारने साठेबाजांविरुद्ध कडक पावले उचलत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत जेणेकरून सणासुदीच्या काळात भाव स्थिर राहतील.

दुसरीकडे आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात बसला आहे. गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून याचा परिणाम सर्वसामान्यांपासून हॉटेल, रेस्टॉरंट्स तसंच कंपन्यांना बसताना दिसत आहे. गॅस सिलिंडरसाठी नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर मोठी गर्दी केली आहे. सध्या राज्यात गोंधळाचे वातावरण आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्सला बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. मुंबईत सध्या २० टक्के हॉटेल्स बंद आहेत. येत्या दोन दिवसांत जर गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर ५० टक्के हॉटेल्स बंद होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: शिक्षकांसाठी ऐतिहासिक निर्णय! UGC स्केल लागू, पगारात होणार भरघोस वाढ

Weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी भाकरी खावी की चपाती? तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Maharashtra News Live Update: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, शेतकऱ्याने बांध पेटवून दिला

Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; ₹६००० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Stomach Heat Relief Remedies: उन्हाळ्यात पोटातील उष्णता कमी करतील हे 7 घरगुती उपाय, पचनक्रियाही सुधारेल

SCROLL FOR NEXT