Former Mumbai Mayor Kishori Pednekar appointed as Group Leader of UBT Shiv Sena corporators in BMC. Saam Tv
Video

उमेदवारीसाठी आधी वेट अँड वॉच, निवडणुका होताच ठाकरेंनी किशोरी पेडणेकरांना दिली मोठी जबाबदारी|VIDEO

Kishori Pednekar Appointed As UBT Group Leader In BMC: उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाचा हा महत्त्वाचा राजकीय निर्णय मानला जात आहे.

Omkar Sonawane

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड झाली आहे. ठाकरे गटाची या संदर्भात बैठक पार पडली. यावेळी त्यांचे नाव जाहीर करत गटनेतेपदी नियुक्त करण्यात आली.

गटनेतेपदासाठी विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव यांची नावे चर्चेत होती. परंतु बैठकीनंतर किशोरी पेडणकर यांची नियुक्त करण्यात आली. यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूनी युती करत निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना मोठा धक्का बसला आणि 25 वर्ष एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप युतीने ठाकरेंची सत्ता उलथवून लावली. 89 जागा मिळवत भाजपने मोठी मुसंडी मारली. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या. शिंदेंच्या शिवसेनेला 29, कॉँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, शरद पवार गटाला, 1 अजित पवार गटाला 3, समाजवादी पार्टीने 2 जागा जिंकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत भाजपचीच सत्ता, ४० वर्षानंतर मायानगरीवर राज्य करणार; महापौरपदासाठी कुणाची नावे आघाडीवर?

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यातील शिरूर आढळून आले तब्बल २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ

Chanakya Niti: या 2 गोष्टींना घाबरणारे लोक आयुष्यात कधीच मिळवत नाहीत पैसा, सत्य वाचून बसेल धक्का

भारतीय वायूसेनेचं विमान थेट तलावात, भीषण स्फोट अन् धुराचे लोट; पाहा थरारक VIDEO

ZP Election : उमेदवारीवरून छत्रपती संभाजीनगरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, VIDEO

SCROLL FOR NEXT