expiry food  saam tv
Video

Mumbai News: खुशी कंपनीची नागरिकांच्या जिवाशी खेळणारी 'ट्रेडिंग'; डीमार्टमधून एक्सपायर झालेल्या मालाची खरेदी|VIDEO

Shocking FDA Raid: डी मार्टमधून एक्सपायरी झालेला माल खरेदी करून तो नव्याने रिपॅकिंग करून बाजारात विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Omkar Sonawane

मुंबई: खुशी ट्रेडिंग कंपनीकडून हा एक्सपायरी झालेला माल खरेदी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली असून, संबंधित ठिकाणी छापे टाकून माल जप्त करण्यात आला आहे.

घाटकोपर, नवी मुंबई आणि भिवंडी या ठिकाणांहून अन्न व औषध प्रशासनाने मोठ्या प्रमाणात हा माल जप्त केला आहे. या प्रकारामुळे खाद्य सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाले असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार डी मार्ट आणि खुशी ट्रेडिंग कंपनी विरोधात तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. संबंधित कंपन्यांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना उत्पादन व समाप्ती दिनांक तपासावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 17 Pro: 'या' ५ देशांमध्ये Apple iPhone 17 Pro स्वस्तात मिळणार, ₹37,424 होईल बचत

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर ठिकाण; निळाशार समुद्र, सोनेरी वाळू अन् लपलेलं पर्यटन रत्न

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर, कसा असेल दौरा? VIDEO

MNS : प्ले ग्रुपमधील चिमुरड्याला मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शरीरावर असलेल्या बर्थमार्कमुळे कॅन्सर होऊ शकतो का?

SCROLL FOR NEXT