Khan Sir during the inauguration of his new free dialysis center in Patna on Shravan Monday. Saam Tv
Video

Khan Sir: खान सर पुन्हा चर्चेत! श्रावणी सोमवारी घेतला हा मोठा निर्णय|VIDEO

Khan Sir Social Work For Kidney Patients: खान सरांनी श्रावण सोमवारच्या दिवशी मोफत डायलिसिस सेंटर सुरू करत एक सामाजिक पाऊल उचलले आहे. त्यांनी नवरात्रीमध्ये आशियातील सर्वात मोठी ब्लड बँक सुरू करण्याचाही निर्धार व्यक्त केला.

Omkar Sonawane

  • खान सरांनी श्रावण सोमवारच्या दिवशी पाटणामध्ये मोफत डायलिसिस सेंटरची स्थापना केली.

  • रुग्णांसाठी आवश्यक यंत्रणा जर्मनीहून आयात करण्यात आली असून सर्व सेवा मोफत असणार आहेत.

  • डायलिसिससाठी लागणारा महागडा खर्च सर्वसामान्य रुग्णांना न परवडणारा आहे, त्यामुळे हा निर्णय स्वागतार्ह.

  • खान सर येणाऱ्या नवरात्रीमध्ये आशियातील सर्वात मोठी ब्लड बँक उभारणार असल्याचं जाहीर.

आपल्या व्हिडिओमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेले बिहारचे खान सरांनी आज श्रावण सोमवारचे औचित्य साधत डायलिसिस सेंटरची स्थापना केली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, आज श्रावणी सोमवार आहे. आपण नेहमीच समाजाच्या प्रति काहीतरी चांगले केले पाहिजे. आणि आज महादेवाचा वार आहे.

यापेक्षा कोणता दिवस मोठा असू शकतो. त्यामुळे आज रुग्णांसाठी डायलिसिस सेंटर सुरू केले आहे. आणि या सगळ्या मशीनरी आम्ही जर्मनीमधून आणल्या आहेत. या पेशंटला आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावे लागते आणि त्याचा खर्च हा पन्नास हजारापेक्षा जास्त असतो. सामान्य माणूस हा खर्च ऐकूनच मानसिकरित्या संपून जातो. त्यामुळे मी हा निर्णय घेतला असून या सर्व पेशंटला मोफत सुविधा मिळणार आहे असे ते म्हणाले. खान सर पुढे म्हणाले, तसेच येणाऱ्या नवरात्रीमध्ये ब्लड बँक देखील स्थापन करणार आहोत आणि ही ब्लड बँक आशिया खंडातील सर्वात मोठी बँक राहील असे ही ते म्हणाले.

कोण आहेत खान सर?

खान सर हे एक लोकप्रिय शिक्षक आणि यूट्यूब कंटेंट क्रिएटर आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ते अतिशय परवडणाऱ्या दरात मार्गदर्शन करतात. कमी कालावधीत त्यांनी संपूर्ण देशभरात आपली ओळख निर्माण केली आहे. ‘खान जीएस रिसर्च सेंटर’ या त्यांच्या यूट्यूब चॅनेलला सुमारे 2.4 कोटी सबस्क्राइबर्स आहेत. या चॅनेलवर शेकडो शैक्षणिक व्हिडिओ उपलब्ध आहेत, ज्यामध्ये चालू घडामोडी, राजकारण, गणित अशा अनेक विषयांचा समावेश आहे.अलीकडेच पाटणामध्ये आयोजित 'चॅम्पियन्स ऑफ चेंज बिहार' या पुरस्कार सोहळ्यात, बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते खान सरांना सन्मानित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Weather Update: IMDच्या नव्या अंदाजानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली; महाराष्ट्रात दोन आठवडे पावसाची दांडी

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

SCROLL FOR NEXT