kalyan news  Saam Tv
Video

दाबा लोकशाहीचं बटण, दाबून खा चिकन-मटण, खाटिक समाज आणि काँग्रेसचे हातात कोंबड्या घेऊन निदर्शन | VIDEO

Khatik Community And Congress Symbolic Protest: केडीएमसीने १५ ऑगस्ट रोजी मांसविक्री बंदीचा निर्णय घेतल्यावर खाटिक समाज आणि काँग्रेसकडून केडीएमसी मुख्यालयासमोर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. हातात कोंबड्या घेऊन कार्यकर्त्यांनी विरोध व्यक्त केला.

Omkar Sonawane

  1. केडीएमसीने १५ ऑगस्ट रोजी मांसविक्री बंदीचा निर्णय घेतला.

  2. खाटिक समाज आणि काँग्रेसने मुख्यालयाबाहेर हातात कोंबड्या घेऊन प्रतिकात्मक आंदोलन केले.

  3. प्रशासनाच्या निर्णयावर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून विरोधाची प्रतिक्रिया उमटली.

  4. पोलिसांनी मुख्य रस्ते बंद करून आणि मोठा फौजफाटा तैनात करून खबरदारी घेतली.

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण: गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात गाजत असलेल्या 15 ऑगस्ट रोजी मांसविक्री बंदीच्या केडीएमसीच्या निर्णयाविरोधात आज खाटिक समाज आणि काँग्रेस पक्षाकडून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. खाटिक समाज आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये कोंबड्या घेऊन केडीएमसीच्या या निर्णयाचा विरोध केला.

15 ऑगस्ट रोजी मांसविक्री बंदीच्या केडीएमसीने घेतलेल्या निर्णयाची प्रसिद्धी माध्यमांद्वारे माहिती मिळाल्यानंतर त्याचे तीव्र सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटत आहेत. अगदी दिल्लीतील केंद्रीय नेत्यांपासून ते मुंबईच्या मंत्रिमंडळापर्यंत नेत्यांकडून या निर्णयावर सकारात्मक आणि विरोधातमक प्रतिक्रिया उमटल्या. तसेच स्थानिक पातळीवरही हिंदू खाटिक समाजाने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत आजच्या 15 ऑगस्ट रोजी केडीएमसी मुख्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. तर या तीव्र विरोधानंतरही केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहत कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय बदलणार नसल्याचे दोनच दिवसांपूर्वी स्पष्ट केले.

या सर्व पार्श्वभूमीवर हिंदू खाटिक समाजाने आणि काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी आज आंदोलनाचा इशारा दिला होता. परिणामी झेंडावंदन झाल्यानंतर आज सकाळपासूनच केडीएमसी मुख्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तर खबरबदारीचा उपाय म्हणून शंकरराव चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा आणि तिकडून इकडे येणारे दोन्ही मुख्य रस्ते पोलिसांनी बॅरिकेट लावून बंद केले होते.

दरम्यान सुरुवातीला खाटिक समाजाच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी अचानक केडीएमसी मुख्यालयाबाहेर धडक देत निदर्शने केली. हातामध्ये कोंबड्या घेत त्यांनी केडीएमसीच्या या निर्णयाचा विरोध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं! मालेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन

Maharashtra Live Update: मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्कर

मतदान केलं त्यांनी निधी मागायचा नाही; मंत्री पंकजा मुंडेंची कुणाला तंबी?

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव

लास्ट स्टेजमधील कॅन्सर बरा होऊ शकतो का?

SCROLL FOR NEXT