बीडमधील भगवान गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा झाला. या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणामध्ये धनंजय मुंडे यांनी 'कठीण काळात मला माझ्या बहिणीने आधार दिला.', असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानावर आता करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्यावर सडकून टीका केली.
करुणा मुंडे यांनी सांगितले की, '२००९ पासून २०२२ पर्यंत हे दोघे भाऊ-बहीण एकमेकांसाठी कटकारस्थान रचत होते. आज ते म्हणतात की माझ्या बहिणीने मला आधार दिला. ती बहीण धनंजय मुंडेंना त्रास देत होती. धनंजय मुंडे रात्री २- ३ वाजेपर्यंत माझ्या मांडीवर रडत होते. आज तिचा आधार वाटतो असे म्हणतात. तुम्ही म्हणता शेतकऱ्यांना पंकजाताई न्याय देतील. अरे कशाला न्याय देतील. आज वैद्यनाथ कारखाना तुम्ही सांभाळू शकत नाही. तुम्ही गोरगरिबांचे पैसे देऊ शकत नाही. ऊसतोड कामागारांचे पैसे कारखान्यात अडकले आहेत. तुम्ही जे काम करतात त्यातून तुम्ही फक्त गुंड लोकांना बळ देत आहात. तुमच्या सभेमध्ये वाल्मीक करायचे पोस्टर पाहायला मिळाले आहे. '
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.