Karuna Munde- Dhananjay Munde  saam tv
Video

Karuna Munde- Dhananjay Munde : धनंजय मुंडेंविरोधात करुणांचं उपोषणास्त्र, अडचणी वाढणार!

Karuna Munde's Hunger Strike Against Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी प्रतिज्ञापज्ञ दाखल करताना कौटुंबिक माहिती चुकीची दिल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती. मात्र, कारवाई न झाल्याने करुणा मुंडे या धनंजय मुंडेंविरुद्ध मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत.

Nandkumar Joshi

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला झालेली अटक, तसेच घोटाळ्याच्या आरोपांमुळं अडचणीत आलेले धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा या उपोषणाला बसणार आहेत. त्या मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसतील.

काही दिवासांपूर्वी धनंजय मुंडे-करुणा यांच्या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयानं निर्णय दिला होता. करुणा यांच्या बाजूने हा निकाल देण्यात आला होता. यानंतर करुणा यांच्याकडून न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं. धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती. मात्र, अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. बीड निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्रात कौटुंबिक आणि मालमत्तेसंदर्भात माहिती देताना ती चुकीची दिली होती, असा आरोप करतानाच त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करुणा यांनी केली होती. या मागणीसाठी त्या मुंडेंविरोधात आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. अधिवेशनाआधीच करुणा उपोषणाला बसणार असल्याने मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, विरोधकांकडूनही त्यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

Kidney disease symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वीच सावध व्हा; 'या' 3 टेस्ट देतील जीवनदान

Fresh Flowers : पूजेची फुले लगेच वाळतात? 'ही' १ सोपी ट्रिक वापरा, आठवडाभर राहतील ताजी तवानी

SCROLL FOR NEXT