Kamaal Khan Sparks Outrage Over Sambhaji Maharaj saam tv
Video

Kamaal Khan Controversy : कमाल खानचा शाहिस्तेखान करू, आमदार संग्राम जगताप यांचा इशारा, VIDEO

Kamaal Khan Sparks Outrage Over Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या अभिनेता कमाल खानला मंत्री नीतेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

Saam Tv

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या कमाल खान याच्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गंभीर दखल घेतली. सोशल मीडियावरून संबंधित आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी तातडीने दिले आहेत. दुसरीकडे मंत्री नीतेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांनी कमाल खानला इशारा दिला आहे.

संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री नीतेश राणे यांनी दिली. तर कमाल खानचा शाहिस्तेखान करू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाबद्दल काय केलं होतं, ते सांगायची गरज नाही. ज्या बोटानं त्याने काही लिहिलं आहे, त्याचा निश्चितच कमाल खान नाही तर शाहिस्तेखान करण्याचं काम महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचे मावळे करण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत जगताप यांनी इशारा दिला आहे.

छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. या खान नावाच्या माणसाला तोंड उघडायचं असेल तर पोलीस आपलं काम निश्चितच करतील, पण त्याच्यात काय उरलंसुरलं असेल तर त्याला आमचे शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते आहेतच, असे नीतेश राणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT