Kalyan Ambulance Issue saam tv
Video

Kalyan: छातीत दुखू लागल्याने १०८ ला कॉल केला, पण रुग्णवाहिकेला ४० मिनिटं उशिर; तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू, कल्याणमधील संतापजनक घटना

Kalyan Ambulance Issue: कल्याणमध्ये रुग्णवाहिका यायला उशिर झाल्यामुळे एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली.

Priya More

कल्याणमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दीपक हॉटेल परिसरात मेवालाल गुप्ता या वृद्ध व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांनी स्वतः 108 क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका मागवली. पण रुग्णवाहिका यायला ४० मिनिटं लागली. रुग्णवाहिका येईपर्यंत या व्यकीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्टेशन समोर दीपक हॉटेल परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीला छातीत दुखू लागले. त्या व्यक्तीने १०८ नंबरवर कॉल करून रुग्णवाहिकेला बोलावलं. पण रुग्णवाहिका ४० मिनिटं उशिराने आली तोपर्यंत या व्यक्तीच्या मृत्यू झाला. घडलेला प्रकारानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला. रुग्णवाहिका पोहोचल्यानंतर त्यामध्ये डॉक्टर नव्हता. डॉक्टर नंतर आला आणि नागरिकांच्या रोष बघून तो पळून गेला.

कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालय ते दीपक हॉटेल पोहोचायला फक्त तीन मिनिटे लागतात. या रुग्णवाहिकेला पोहोचायला चाळीस मिनिटे लागली. ॲम्बुलन्स उशिराने पोहोचली मात्र त्यामध्ये डॉक्टर नव्हता. हा निष्काळजीपणाचा कळस आहे. याआधी देखील कल्याणमधील रुक्मणीबाई रुग्णालयामध्ये असा निष्काळजीपणा अनेकदा समोर आला आहे. आता या प्रकरणात संबंधित डॉक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT