kalyan railway police station waterlogging due to heavy rains saam tv
Video

Kalyan Rain : कल्याणला पावसाचा तडाखा, पोलीस ठाण्यात घुसलं पाणी | VIDEO

Kalyan Rain Floodwater : कल्याणमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात पावसाचं पाणी घुसलं. स्वागत कक्ष, आरोपींच्या लॉकअपसह पॅसेजमध्ये पाणी साचल्याने कामकाजावर परिणाम झाला.

Nandkumar Joshi

संघर्ष गांगुर्डे, कल्याण | साम टीव्ही

कल्याण शहर आणि परिसराला आज सकाळपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर पावसाचा जोर हळूहळू वाढला. अर्धा ते एक तासातच कल्याणमधील काही रस्ते पाण्याखाली गेले. सखल भागांत पाणी साचू लागलं आहे. अगदी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात देखील पाणी शिरलं. पोलिसांना दैनंदिन कामकाज करताना अडचणी आल्या. लोहमार्ग पोलिसांनी पंपाच्या मदतीने पाणी उपसण्याचे काम सुरू केले. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने पोलीस तालुक्यातील स्वागत कक्ष, आरोपींचे लॉकअप आदी ठिकाणी देखील पाणी साचलं होतं. पोलिसांना या साचलेल्या पाण्यात उभं राहून कामकाज करावं लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BSNL Recharge Plan: फक्त १ रुपयात २४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन; २४GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या फायदे

Banana Vs Pomegranate Fruit Benefits: केळी खावी की डाळिंब? डॉक्टरांच्या मते 'हे' फळ देतं शरीराला दुप्पट ताकद; पाहा आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

Gondhal Movie: ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपटाची एंट्री! 'गोंधळ'ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 हजाराच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT