Local leaders inspecting Anand Dighe Bridge in Kalyan amid political clash between BJP and Shinde Sena. Saam Tv
Video

कल्याणमध्ये भाजप-शिंदेसेना संघर्ष! आनंद दिघे पुलावरुन श्रेयवाद रंगला|VIDEO

BJP vs Shinde Sena Clash In Kalyan: कल्याण शहरातील आनंद दिघे पुलाच्या उद्घाटनावरून भाजप आणि शिंदेसेना मध्ये राजकीय संघर्ष उभा राहिला. नागरिकांना दिलासा मिळाला तरी राजकीय वाद सुरू आहेत.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण शहरातील स्वर्गीय आनंद दिघे पुलाचे उद्घाटन कोण करणार यावरून आज शिवसेना आणि भाजप मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले. आज सकाळी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी पुलाची पाहणी करून संध्याकाळी पूल खुला होणार असे सांगितले होते. भाजपकडून आज संध्याकाळी पाच वाजता पुलाचे अधिकृत उद्घाटन होणार होते. मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेने अचानक कृती करत पूल वाहतुकीसाठी खुला केल्याची घोषणा केली. त्यामुळे पूल आज दुपारीच नागरिकांसाठी खुला करण्यात आला.

यावर शिवसेनेने स्पष्ट भूमिका घेतली की, हे श्रेयासाठी केलेले काम नाही. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पूल तत्काळ सुरू केला,असे शहर संपर्क प्रमुख महेश गायकवाड आणि शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी सांगितले. दुसरीकडे भाजपकडून अधिकृत उद्‌घाटनाची तयारी सुरू होती. अचानक घडलेल्या या घडामोडीनंतर दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई अधिकच चिघळली असून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

स्थानिक नागरिक मात्र पूल सुरू झाल्यामुळे दिलासा व्यक्त करत आहेत, तर राजकीय रंग चढलेल्या या प्रकाराची जोरदार चर्चा शहरभर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेचा रविवारचा साप्ताहिक मेगा ब्लॉक नसणार

Pune Land Scam Case: पुणे पोलिसांकडून शितल तेजवानीच्या घराची झाडाझडती; महत्त्वाचे कागदपत्रे जप्त, कालाचिठ्ठा येणार बाहेर

Fruit Kheer Recipe : भूक लागलीय? गोड खावंसं वाटतंय? झटपट बनवा हेल्दी फ्रूट खीर

अंधारात फोनवर बोलत होता, अचानक बिबट्याचा हल्ला झाला अन्...; पाहा व्हिडिओ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 नाहीतर जमा होणार 3000 रुपये?

SCROLL FOR NEXT