jyoti waghmare  Saam tv
Video

डोक्यावर पदर, हातात संविधान..; सावित्रीबाई फुलेंच्या वेशात ज्योती वाघमारेंची खासदारकीची शपथ, व्हिडिओ व्हायरल

jyoti waghmare news : सावित्रीबाई फुलेंच्या वेशात ज्योती वाघमारेंची खासदारकीची शपथ घेतली. ज्योती वाघमारे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांचा आज सोमवारी राज्यसभेत शपथविधी पार पडला. राज्यसभेत शरद पवार, रामदास आठवले आणि इतर खासदारांचा शपथविधी पार पडला. या शपथविधीत ज्योती वाघमारे यांनी सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेत सावित्रीबाई फुले यांचा वेशात खासदारकीची शपथ घेतली. डोक्यावर पदर, हातात संविधान आणि कपाळावर आडवी चिरी लावत वाघमारेंनी शपथ घेतली.

राज्यसभेत हा भावनिक आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळालाय. सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी ज्योती वाघमारेंनी हा वेशात केल्याचं सांगितलं जात आहे. या अनोख्या शपथविधीमुळे राज्यसभेत उपस्थित सदस्यांनीही टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. या शपथविधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Panvel : उंच कडे अन् कातळ पायऱ्या; पनवेलजवळ वसलाय 'हा' भव्य किल्ला, प्रत्येक पावलावर अनुभवाल थरार

Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका, 'या' शहरात ११२ रुपयांना पेट्रोलची विक्री; तुमच्या शहरातील दर किती?

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी प्रश्न पुरवण्याचा बदल्यात हवालदार यांनी रोख रक्कम स्वीकारल्याचं सीबीआय तपासात स्पष्ट

Crime News: खोलीत बोलवून जबरदस्तीने किस, नंतर प्राइव्हेट पार्टला...; बॉक्सिंग कोचचं अल्पवयीन तरुणीसोबत विकृत कृत्य

कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाला जीवे मारण्याची धमकी; घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT