Fort In Panvel : उंच कडे अन् कातळ पायऱ्या; पनवेलजवळ वसलाय 'हा' भव्य किल्ला, प्रत्येक पावलावर अनुभवाल थरार

Shreya Maskar

रायगड

कलावंतीण दुर्ग हा रायगड जिल्ह्यात, पनवेलजवळ, पश्चिम घाटात वसलेला २,२०५ फूट उंचीचा एक गिरीदुर्ग आहे. कलावंतीण दुर्ग लोणावळ्याजवळील एक ऐतिहासिक ठिकाण आहे.

Raigad District | google

कलावंतीण दुर्ग

कलावंतीण किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेकिंगची सुरूवात 'ठाकुरवाडी' या गावातून होते. कातळकोरीव पायऱ्या येथे आहेत. तुम्ही येथे मित्रांसोबत ट्रेकिंगचा थरार अनुभवू शकता.

Kalavantin Durg | google

ट्रेकिंग

कलावंतीण दुर्ग जगातील सर्वात धोकादायक किल्ल्यांपैकी एक म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. अनेकदा या चढाईला 'स्वर्गाकडे जाणारी वाट' (Climb to Heaven) असे संबोधले जाते. ज्यामुळे पर्यटक येथे जाताना १०० वेळा विचार करतात.

Trekking | google

थरारक अनुभव

शिखराकडे जाणारी अंतिम चढाई ६० ते ८० अंशांच्या कोनात वळणावळणाने वर जाणाऱ्या पायऱ्यांची बनलेली आहे. या पायऱ्या थेट काळ्या बसाल्ट खडकात कोरून काढल्या आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारची रेलिंग किंवा दोरखंड लावलेले नाहीत.

A Thrilling Experience | google

रोमांचक अनुभव

पायऱ्यांच्या दुतर्फा असलेल्या खोल दऱ्या आणि उघड्या कडा थरारक अनुभव देतात. कलावंतीण दुर्ग किल्ल्यावरून निसर्गाच अद्भूत नजारा पाहायला मिळतो.

An Exhilarating Adventure | google

प्राचीन गुहा

कलावंतीण दुर्ग आणि लगतच्या प्रबळगड परिसरात खडकात खोदलेल्या अनेक गुहा आणि पाण्याची टाकी आहेत. ज्यांचा वापर पूर्वीच्या काळी सैनिकांच्या निवासासाठी आणि पाण्याच्या साठ्यासाठी (टाक्या) केला जात असे.

Ancient Caves | google

प्रबळमाची पठार

कलावंतीण दुर्गाचा अंतिम शिखराच्या चढाईसाठी तळ म्हणून प्रबळमाची पठार ओळखले जाते. हे हिरवेगार पठार स्वतःच एक स्वतंत्र पर्यटन स्थळ आहे. येथे कॅम्पिंगसाठी नयनरम्य जागा आहे. सभोवतालच्या पर्वतांची विहंगम दृश्ये अनुभवता येतात.

Prabalmachi Plateau | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Kalavantin Durg | google

NEXT : मराठा साम्राज्याची राजधानी 'राजगड' चं पहिलं नाव काय?

Rajgad Fort | saam tv
येथे क्लिक करा...