somnath suryavanshi case  Saam Tv
Video

Somnath Suryavanshi Case: 302 चा गुन्हा दाखल करून दोषी पोलिसांना फाशी द्या; सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईची मागणी, VIDEO

Mother demands death penalty for guilty police officers: परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्याच मारहाणीत झाला असल्याचे आता सिद्ध झाले आहे. यावरच सूर्यवंशी कुटुंबीयांनी दोषी पोलिसांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे.

Omkar Sonawane

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्याच मारहाणीत झाला असल्याचे आता सिद्ध झाले आहे. गोपनीय अहवाल मानवधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला असून संबंधित पोलिसांना नोटीसा बाजावून उत्तर मागितले आहे. याबाबतच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच झाला असल्याचा आरोप करत त्यांच्या कुटुंबीयांनी दोषी पोलिसांवर मानुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले, आमच्या लेकराचा खून पोलिसांनीच केला आहे. आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो, पण कोणी ऐकलं नाही. आता अहवाल समोर आला आहे, त्यामुळे दोषी पोलिसांवर तातडीने मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी. आज 95 दिवस झाले असून शासनाने या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई केली नाहीये.मात्र आज तो अहवाल समोर आला आहे. त्यामुळे दोषी पोलिसांवर 302 चा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

SCROLL FOR NEXT