Jogeshwari News SaamTv
Video

Jogeshwari News : जोगेश्वरीत पोलिसांवर दगडफेक; पाच पोलीस जखमी, काय आहे कारण? पाहा Video

Stone Pelting On Police : मुंबईत अनधिकृत घरांवर तोडक कारवाईला गेलेल्या पोलिसांच्या पथकावर झोपडीधारक आंदोलकांनी दगडफेक केली आहे. त्यासाठी मोठा बंदोबस्त आता तैनात करण्यात आला आहे.

Saam Tv

मुंबईत अनधिकृत घरांवर तोडक कारवाईला गेलेल्या पोलिसांवर आंदोलकांनी दगडफेक केलेली आहे. रेल्वे प्रशासनाकडून कारवाई केली जात असतानाच मुंबईच्या जोगेश्वरी भागात आंदोलक आक्रमक झालेले आहेत. झोपडीधारकांनी केलेल्या या दगडफेकीत पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. याठियाणी सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेत रेल्वेचा हद्दीमध्ये असलेल्या अनधिकृत घरावर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. या विरोधात झोपडपट्टी धारकाकडून रेल्वे प्रशासनाचे विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. कारवाईसाठी आज पोलिसांचं तोडक पथक याठिकाणी दाखल झालं. त्यानंतर झोपडीधारक आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत.

दरम्यान, मोर्चाला परवानगी नसल्यामुळे जोगेश्वरी पोलिसांनी २० ते २५ आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. तसंच जोगेश्वरी पोलिसांकडून दगडफेक प्रकरणी आणि बिना परवाना आंदोलन करणारे झोपडीधारकांचे विरोधात गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT