Manasvi Choudhary
दूध हे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. दुधातील घटक त्वचेला मऊ- मुलायम करण्यास मदत करते.
जर तुमची त्वचा खुपच कोरडी असेल तर तुम्ही घरच्या घरी दूध आणि हळदीचा फेसपॅक लावू शकता.
दुधामध्ये हळद मिक्स करून चेहऱ्याला लावा. हळद औषधी आणि जंतुनाशक गुणधर्मामुळे त्वचेवरील काळे डाग, त्वचेची जळजळ कमी करते.
दुधातील फॅट्स आणि लॅक्टिक ॲसिड त्वचेच्या आत जाऊन हायड्रेट करतात. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
एका छोट्या वाटीमध्ये दूध आणि हळद एकत्र करा.
ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावा. साधारण १० ते १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.
आठवड्यातून २ ते ३ वेळा हा नैसर्गिक उपाय तुम्ही करू शकता.
दुध - हळदीचा नॅचरल फेसपॅक नियमित लावल्याने त्वचेचा पोत सुधारून ती मऊ, लवचिक आणि घट्ट बनते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.