Manasvi Choudhary
चणे आणि शेंगदाणे खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीराला सृदृढ बनवण्यासाठी आणि प्रोटीनची कमरता भरून काढण्यासाठी चणे, शेंगदाणे फायदेशीर आहेत.
चण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, तर शेंगदाण्यामध्ये हेल्दी फॅट्स आणि जास्त प्रोटीन असते.
चण्याचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' खूप कमी असतो, त्यामुळे ते खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही. शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते
चण्यातील फायबरमुळे वजन कमी होण्यास मदत होते. तर शेंगदाणे खाल्ल्याने शरीराची उर्जा वाढते व वजन वाढण्यासही मदत होते.
शेंगदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटस असतात तर चण्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते.
चणे आणि शेंगदाणे हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर दोन्हीचे सेवन केल्याने हेल्दी फॅट्स वाढतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.