Jitendra Awhad addressing the media after the Vidhan Bhavan clash, visibly angry over the alleged assault and verbal abuse.  Saam Tv
Video

Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar: कोणी मवाल्यासारखा येतो, शिव्या देतो, एवढा माज सत्तेचा? जितेंद्र आव्हाडांची तळपायाची आग मस्तकाला|VIDEO

Maharashtra Politics: विधानभवनातील मारहाणीच्या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड प्रचंड संतापले असून आमदारच सुरक्षित नसतील तर काय अर्थ आहे लोकशाहीला? असा सवाल करत सत्ताधाऱ्यांच्या मुजोरीवर जोरदार टीका केली.

Omkar Sonawane

विधानभवनाच्या लॉबीमध्ये काही वेळापूर्वी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तूफान हाणामारी झाली यानंतर

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जितेंद्र आव्हाडांना हाणामारीबाबत प्रश्न विचारला असता, हल्ला कोणी केला? असा प्रतिप्रश्न आव्हाडांनी केला. हा हल्ला पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी केला, असं आव्हाडांनी सांगितलं. अख्ख्या महाराष्ट्राला समजलं की कोणी हल्ला केला...आम्हाला याच्यापेक्षा काही जास्त पुरावेच द्यायचे नाहीत. जर तुम्ही विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करत असतील तर आम्हीच सुरक्षित नाहीत. मी स्वतः याबाबत ट्विट टाकलं आहे. शिवीगाळ करतो, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर...असं बोललं जातंय, काय चाललंय काय विधानसभेत.

मी भाषण करून बाहेर आलो. मोकळ्या हवेवर आलो होतो. हे मलाच मारण्यासाठी सगळे आले होते. विधानसभेत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आणि विधानभवनात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला.

काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आणि आम्हाला शिव्या देतो. त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून घोषित करा ना. असंसदीय शब्द वापरले जातात. सत्तेची एवढी मुजोरी. एवढा माज आहे का सत्तेचा? असा संतापही आव्हाडांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : दवाखान्यावर खर्च होणार, मित्रांच्या चुका माफ करणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, जाणून घ्या

Morning Health Tips: रोज सकाळी पोट साफ होत नाही? आहारात करा 'हे' 5 बदल

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

SCROLL FOR NEXT