international news saam tv
Video

Airbike: विज्ञानाचा चमत्कार! हवेत उडणारी बाईक केली तयार, पाहा व्हिडिओ

From Dream to Reality: तुम्ही आता बाईकवर बसून उडू शकणार आहात हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. कारण आता पोलंडच्या व्होलोनॉट कंपनीने एअरबाईक तयार केली असून ही एअरबाईक 200 किलोमीटर प्रति ताशी वेगाने उडू शकते.

Omkar Sonawane

पोलंडमधील 'व्होलोनॉट' (Jetson) कंपनीने विज्ञानाच्या कक्षेत आणखी एक मैलाचा दगड रोवला आहे. त्यांनी तयार केलेली एअरबाईक आता चर्चेचा विषय बनली आहे.

ही एअरबाईक तब्बल 200 किलोमीटर प्रति तास वेगाने उडण्यास सक्षम आहे. यामध्ये जेट प्रोपल्शन प्रणाली आणि स्टेबिलायझेशन सिस्टम देण्यात आली आहे, ज्यामुळे ही बाईक हवेत अत्यंत स्थिरतेने आणि सुरक्षिततेने उडते. विशेष बाब म्हणजे, ही बाईक हवेत एका जागी थांबते, आणि नंतर हळूहळू दिशा बदलून पुढे जाते, हे दृश्य पाहणाऱ्यांसाठी नक्कीच आश्चर्यकारक ठरत आहे.

सध्या कंपनीने या एअरबाईकची सविस्तर माहिती जाहीर केलेली नसली तरी, या तंत्रज्ञानाची झलक पाहूनच लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

जर ही एअरबाईक प्रत्यक्षात बाजारात आली, तर ती निश्चितच विज्ञानाच्या दुनियेत एक अभूतपूर्व क्रांती ठरेल, आणि बाईकप्रेमींसाठी स्वप्नातली सफर सत्यात उतरल्यासारखी वाटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टँकरचा भीषण अपघात

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गुजराती भाषेमधून भाषण; सोशल मीडियावर तुफान चर्चा|Video Viral

SCROLL FOR NEXT