एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आला होता. यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली होती. यानंतर जयकुमार गोरे यांनी या आरोपांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले, माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात. आणि काळ्या बाहुल्या बांधत असतात. मात्र जोपर्यंत जनता आणि माता भगिनी माझ्यासोबत आहेत. तो पर्यंत तुम्ही कितीही पूजा केल्या आणि कितीही बाहुल्या बांधल्या तरी माझे कोणीही काही वाकडे करू शकत नाही. तसेच जोपर्यंत देवा भाऊ आणि भारतीय जनता पार्टी जयकुमार गोरेच्या मागे आहे. तो पर्यंत आपलं कोणीही वाकडं करू शकत नाही असा इशारा त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.