Malokar CCTV News SaamTv
Video

Akola News : राड्यानंतर नेमकं काय घडल? मालोकारचं सिसिटीव्ही फुटेज

Jay Malokar Murder Case : मनसे कार्यकर्ता जय मालोकारच्या मृत्यू आधीचं सिसिटीव्ही फुटेज आलं समोर, शवविच्छेदन अहवालानंतर आता सिसिटीव्ही फुटेजमधूनही अनेक खुलासे होणार.

Saam Tv

अकोला जिल्ह्यामधील मनसे कार्यकर्ते जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं होतं. त्यानंतर आता या घटनेचं सिसिटीव्ही फुटेज समोर आलं आहे. जय मालोकार याला रुग्णालयात दाखल करण्याआधीचं ही फुटेज आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरी यांची गाडी फोडण्याची घटना जुलै महिन्यात घडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर जयच्या शवविच्छेदन अहवालातून अनेक खुलासे झाले होते. आता या संपूर्ण घटनेचा सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाला वेगळं वळण मिळणार आहे. तर मिटकरींसोबत झालेल्या राड्याच्या ताणातूनच जय यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे. त्यामुळे राडा झाल्यानंतर तीन तासांत जयसोबत नेमकं काय झालं होतं याची चौकशी करण्याची मागणी जयच्या कुटूंबियांनी केली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची कुटूंबियांची राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News: साताऱ्यातील महिला डॉक्टरवर दबाव टाकणार 'तो' खासदार कोण? VIDEO

Satara News : डॉक्टर महिला बीडची असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारी डावलल्या? माजी मंत्री धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

Doctor Death Case Satara: ही आत्महत्या नाही… व्यवस्थेने केलेला खून! फलटणच्या डॉक्टर मृत्यूचं गूढ वाढतंय|VIDEO

Maharashtra Live News Update: अमित शहा सोमवारी मुंबईत दौऱ्यावर

टेस्लाच्या स्क्रीनवर दिसतात भुतं? टेस्लामध्ये खरंच रात्री भुतं दिसतात?

SCROLL FOR NEXT