Abhijit Dipke, Jantar Mantar protest  Saam
Video

Abhijit Dipke : जंतर-मंतरवर राडा! आंदोलक अभिजीत दिपकेंवर महिलेने फेकली शाई, अर्वाच्य भाषेत शिवीगाळही

Abhijit Dipke, Jantar Mantar protest : दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनस्थळी बेमुदत उपोषण करणारे अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेने शाई फेकल्याची घटना घडली. घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला.

Namdeo Kumbhar

Jantar Mantar Protest: दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळी आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी बेमुदत उपोषणाला बसलेले मराठी तरुण अभिजीत दीपके यांच्यावर एका अज्ञात महिलेने शाई फेकली. शाई फेकत या महिलेने दीपके यांना जाहीरपणे अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि आंदोलक सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्याने आणि त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेल्यामुळे ही महिला प्रचंड संतापली होती. वांगचुक यांच्या प्रकृतीला आंदोलनकर्तेच जबाबदार असल्याचा आरोप करत तिने हा राडा केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे जंतर-मंतरवर काही काळ तीव्र तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर आंदोलनस्थळचा पोलीस बंदोबस्त अधिक वाढवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पहिला हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार, फडणवीसांची मोठी घोषणा

Hight Growth Tips : तुमच्या मुलांची उंची वाढत नाहीये? 'हे' ६ उपाय नक्की ट्राय करा, महिनाभरात दिसेल रिझल्ट

Maharashtra News Live Update: मन नदीत बैलगाडी उलटून भीषण दुर्घटना; २८ वर्षीय तरुण बेपत्ता, चार बैलांचा मृत्यू

Ramayana: 'रामायणला ऑस्कर मिळालं नाही तर निराशा होईल...'; मुख्यमंत्री फडणवीसांना रणबीर कपूरच्या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा

अमानुष छळ, अनैतिक संबंध अन्... नंतर 7 महिन्यांच्या गरोदर पत्नीला संपवलं, भारतीय लष्काराच्या जवानाचं विकृत कृत्य

SCROLL FOR NEXT