Mysterious Flames Erupt from Ground Saam Tv
Video

Jalna: जालन्यात ज्वालामुखी? जमिनीतून निघतोय ज्वलनशील पदार्थ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पाहा VIDEO

Mysterious Flames Erupt from Ground: जालन्यामध्ये जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येत असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काळ्या रंगाचा ज्वलनशील पदार्थ जमिनीतून बाहेर पडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Priya More

जालन्यातील सामनगाव रोड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीतून अचानक ज्वलनशील पदार्थ बाहेर पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जमिनीतून ज्वाला बाहेर येत असल्यामुळे ही ज्वालामुखी तर नाही ना अशी चर्चा सध्या सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी जमिनीतून काळ्या रंगाचे ज्वलनशील पदार्थ अचानक बाहेर फेकले जात असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. दरम्यान खडकाळ जमिनीमुळे आणि पोलमधून जमिनीत जाणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे जमिनीतून लाव्ह्यासारखे वितळलेले खडक बाहेर येताना दिसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाफा आणि काही तरी जळत असल्यासारखा पदार्थ बाहेर येत असल्याचे नागरिक सांगत आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: राजापूरमध्ये खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू; एका मुलीला वाचवण्यात यश

Rice vs Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी रात्री जेवताना काय खावं

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

SCROLL FOR NEXT