honor killing in Jalgaon, Maharashtra Saam TV News
Video

Jalgaon : प्रेमविवाह केल्याने राग, वडिलांनी लेकीलाच संपवले, लग्नात धाडधाड गोळ्या घातल्या | VIDEO

honor killing in Jalgaon, Maharashtra : जळगावमधील चोपडा येथे ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. भरलग्नात प्रेमविवाह केलेल्या मुलीवर वडिलांनी गोळ्या झाडून ठार केलं. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

Namdeo Kumbhar

Father Kills Daughter At Wedding : प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून एका पित्याने आपल्या मुलीवर आणि जावयावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना जळगावच्या चोपडा शहरात घडली आहे. या गोळीबारात 24 वर्षीय तृप्ती अविनाश वाघ हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती अविनाश ईश्वर वाघ गंभीर जखमी झाला आहे. अविनाशच्या पाठीतून गोळी पोटात घुसल्याने त्याला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी किरण अर्जुन मंगले हे तृप्तीचे वडील आणि सीआरपीएफचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत.

अर्जुन मंगले यांनी लग्नात जाऊन मुलीवर गोळीबार केल्यानंतर एकच खळबळ उडाली. लग्नाला आलेल्या वऱ्हाडी लोकांनी मंगले यांना बेदम मारले. पोलिसांनी मंगले यांची पिस्तुल जप्त केली असून गुन्हा दाखल केला आहे. वऱ्हाडीने बेदम चोपल्यानंतर मंगले गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात उभी फूट; 20 खासदारांनी बनवला वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय नाहीतर...

Aali Lakhabai Song: रौद्र रूप, दमदार नृत्य अन् लोकसंगीताची जादू; अमृता धोंगडेचा 'आली लखाबाई' गाणं प्रदर्शित

Navi Mumbai : सलग ३-४ दिवस लाईट नसल्यानं महिलेचा आक्रोश; उशी - चादर घेऊन थेट महावितरणच्या ऑफिसमध्ये पोहोचली, VIDEO

SCROLL FOR NEXT