Jalgaon Farmer Lathimar at bhadgaon saam tv
Video

lathi charge on farmers : शेतकऱ्यांवर लाठीमार, जळगावमध्ये संताप, Video

lathi charge on farmers in Jalgaon : जळगावच्या भडगाव तालुक्यात शेतकरी संघासमोर टोकनसाठी गर्दी करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेनं शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे.

Nandkumar Joshi

संजय महाजन, जळगाव | साम प्रतिनिधी

जळगावच्या भडगावमध्ये संतापजनक घटना घडलीय. भडगाव शेतकरी संघाच्या भोंगळ कारभारामुळे ज्वारी खरेदीचे टोकन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागल्या. त्यामुळं शेतकऱ्यांची गर्दी झाली. त्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

शेतकऱ्यांनी शेतकरी संघासमोर टोकनसाठी मंगळवारी गर्दी केली होती. शेतकरी रांगेत भर उन्हात उभे होते. पण संबंधित प्रशासनाने त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नव्हती. त्यांच्यासाठी ना पिण्याचे पाणी ना सावलीची सोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी जाब विचारायला सुरुवात केली. काही वेळ गोंधळ झाल्याचे पाहून पोलीस तिथे आले. त्यांनी शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT