iran update saam tv
Video

इराणमध्ये हिंसाचार, २६०० हून अधिक बळी, खामेनेई यांचा थेट अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पना कडक इशारा

Iran Political Crisis : इराणमध्ये हिंसाचारात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेल्याची माहिती आहे. २६०० हून अधिक आंदोलक आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सर्वोच्च नेते खामेनेई यांनी थेट अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिलाय.

Nandkumar Joshi

इराणमधील हिंसक आंदोलन आता शांत झालं असून परिस्थिती सामान्य होतेय. मात्र, या संघर्षात मोठी जीवित आणि वित्तहानी झालीय. 'HRANA' या संस्थेनुसार, हिंसाचारात 2478 आंदोलक आणि 163 सरकारी कर्मचाऱ्यांसह एकूण 2677 जणांचा मृत्यू झालाय. या काळात मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे 317 बँका पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून 4700 हून अधिक बँकांचे नुकसान झाले आहे. 250 मशिदी, 265 शाळा आणि शेकडो गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. रुग्णवाहिका आणि वीज क्षेत्रालाही कोट्यवधी डॉलर्सचा फटका बसला आहे. आंदोलनामुळे इराणच्या अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांना मोठी खीळ बसली आहे.

दुसरीकडं इराणमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये देशाचे प्रमुख नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांनी अमेरिका आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हिंसक निदर्शनं, जीवित आणि वित्तहानी, तसेच कथित दुष्प्रचाराला थेट ट्रम्प जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प हे गुन्हेगार असून, इराणमध्ये अंतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्याही प्रकारचे कटकारस्थान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, अशा कडक शब्दांत खामेनेई यांनी ट्रम्प यांना इशारा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मास्टर प्लॅन

शतप्रतिशत भाजपामुळे मित्रपक्षांनाही धक्का, भाजपने दाखवला मित्रपक्षांना हिसका

२५ वर्षांची सत्ता संपली! ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका का गेली?

मुंबईत महापौरपदासाठी शिंदेंची फिल्डिंग? शिंदेंना हवंय मुंबईचं महापौरपद?

Maharashtra Live News Update: पेण खोपोली मार्गावरील एचपी इंटरनॅशनल कंपनीत भीषण आग

SCROLL FOR NEXT