Raj and Uddhav Thackeray’s political alliance sparks a divide within MNS saam tv
Video

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे-राज ठाकरेंच्या युतीवर मनसेमध्येच मतभेद?

Raj Thackeray - Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील, अशी जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. दुसरीकडे, मनसेच्या नेत्यांमध्येच यावरून मतभेद दिसून येतात. मनसे नेते संदीप देशपांडे आणि प्रकाश महाजन यांनी याबाबत वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. त्यामुळे मनसेमध्येच मतभेद असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

Nandkumar Joshi

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? (will Raj Thackeray and Uddhav Thackeray unite in Maharashtra politics) असा प्रश्न महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तीला पडलाय. या प्रश्नाचं उत्तर मिळेल तेव्हा मिळेल, पण त्याआधी राजकीय वर्तुळही याच चर्चेभोवती गरागरा फिरतंय. ठाकरेंनी एकत्र यावं का, या मुद्द्यावरून राज ठाकरेंच्या मनसेतच मतभेद असल्याचे दिसून येत आहे. युतीसाठी जो उत्साह दिसतोय, तो याआधी का नाही, असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला होता. तर आज मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणसासाठी दोन ठाकरे एकत्र येणे गरजेचे आहे, नाहीतर इतिहास माफ करणार नाही, असं मनसेचे नेते प्रकाश महाजन म्हणालेत. दोन्ही ठाकरेंनी चर्चा करून मराठी माणसासाठीच्या हिताचा निर्णय घ्यावा, असंही महाजन यांनी म्हटलंय.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

काल जो उत्साह दिसला तो याच्या आधी कधी दिसला नाही. दोन वर्षांपूर्वी नाही दिसला. १९ वर्षे झाली मनसे स्थापन होऊन तेव्हा कधी उत्साह दिसला नाही. आताच का उत्साह दिसला नाही. याचा विचार कधी करणार आहोत की नाही आपण. अचानक बॅनर का लागायला लागले. हेच संजय राऊत चार महिन्यांपूर्वी आम्हाला म्हणाले की बाळासाहेबांचा फोटो का लावता? आता अचानक सगळे सकारात्मक झाले याचं कारण काय, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.

इतिहास माफ करणार नाही - महाजन

मराठी माणसाची अपेक्षा, आकांक्षा, वेदना, आंदोलन, आक्रोश हे सगळं यावर टिकून आहे की त्यांच्यासाठी कोण धावून येतं. आम्ही जर क्षुल्लक काही गोष्टी मनात ठेवून जर या मराठी माणसासाठी एकत्र नाही आलो, मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम्ही एकत्र आलो नाही तर इतिहास आम्हाला क्षमा करणार नाही, असे मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Retirement : टीम इंडियाला मोठा झटका; IND VS ENG मालिकेदरम्यान स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

Migraine: प्रवास करताना मायग्रेनचा त्रास होतोय? तर करा 'हे' प्रभावी उपाय

Ben Stokes vs Siraj : सिराजचा घातक चेंडू, बेन स्टोक्स व्हिवळला! थेट गुडघ्यावर बसला; पुन्हा उठताच येईना, VIDEO

Shocking : सख्ख्या ३ लहान बहिणींचा मृत्यू, अन्नातून झाली होती विषबाधा; ठाण्यातील धक्कादायक घटना

Mumbai Local Train: रेल्वे प्रवासी मित्रांनो कृपा लक्ष द्या! मध्य,हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक; जाणून घ्या किती वेळ बंद असेल लोकल

SCROLL FOR NEXT