Kirtankar Indurikar Maharaj quit kirtan saam tv
Video

Indurikar Maharaj : या औलादी माझ्या मुळावर उठणार, इंदुरीकर महाराजांचे चॅलेंज; म्हणाले, मुलीचे लग्न....

Indurikar Maharaj reaction to social media trolling : मुलीच्या साखरपुड्यावरून झालेल्या सोशल मीडिया टीकेला इंदुरीकर महाराजांनी सडेतोड उत्तर दिले. मुलीचे लग्न याहूनही टोलेजंग करणार असल्याचे ते म्हणाले.

Namdeo Kumbhar

why Indurikar Maharaj was criticized for daughter’s engagement : मुलीच्या साखरपुड्यावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या टीकेला कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मुलीचे लग्न अजून टोलेजंग करणार असल्याचे इंदुरीकर महाराज म्हणाले. काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्यावरून इंदुरीकर महाराज यांच्यावर टीकेची झोड उडाली होती.

साधेपणाचा उपदेश करणारे इंदुरीकर स्वतःच्या मुलीच्या कार्यक्रमात मात्र खर्च करत असल्याची टीका त्यांच्या झाली होती. या टीकेवर बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाल की, मुलीचे लग्न आणखी भव्यदिव्य करणार आहे. टीकाकारांना आव्हान देत इंदुरीकर महाराज म्हणाले, 'मला माहीत होतं या औलादी माझ्या मुळावर उठणार आहेत. त्यांना चॅलेंज सांगतो मी (मुलीचं) लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार आहे, बघू कोणाचं काय म्हणणं आहे ते'. मुलीच्या साखरपुड्याच्या खर्चावरून झालेल्या टीकेनंतर त्यांनी हे वक्तव्य केले. यापूर्वीही त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना आपल्या कीर्तनातून उत्तरे दिली होती आणि या नव्या वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:पुसद-अमरावती मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर नागरिकांची कोंडी

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार, मोदी-ममतांची प्रतिष्ठा पणाला

Shocking : भयानक! चैन खेचून रेल्वे थांबवली अन् तरूणीला जबरदस्ती नेलं; ६ जणांनी केला सामूहिक बलात्कार

Tomato Buying Tips: गावरान टोमॅटो कसा ओळखाल? खरेदी करण्यापूर्वी ५ गोष्टी लक्षात ठेवाच

Weekly Horoscope: या आठवड्यात नशिबाची साथ कोणाला? तुमच्या राशीनुसार जाणून घ्या यश-अपयशाचे संकेत

SCROLL FOR NEXT