VIDEO: देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा, Sanjay Raut यांचा मोदींवर घणाघात Saam TV
Video

VIDEO: देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा, Sanjay Raut यांचा मोदींवर घणाघात

Sanjay Raut News: खारघरमधील साधकांच्या मृत्यु प्रकरणावरुन संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. घटनेला सरकार जबाबदार असल्याचं संजय राऊत म्हणाले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

खारघरमधील सत्संग चेगराचेंगरी घटनेवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. खारघरचा विषय आता सरकारने मागे टाकला आहे, खारघरला जे साधक मरण पावले हे अत्यंत दुर्दैवी होतं गृहमंत्री, मुख्यमंत्री तिथे उपस्थित होते, संपूर्ण मंत्रिमंडळ तिथे उपस्थित होतं पण खारघरच्या त्या दुर्घटनेला शेवटी जबाबदार कोणालाही ठरवलं नसल्याचं संजय राऊत म्हणाले.अशा घटनांची चौकशी करण्यासाठी सरकार जेव्हा एसआयटी नेमत तेव्हा ती धुळफेक असते असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. इतक्या साधकांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत या घटनेला सरकार जबाबदार असल्याचं संजय राऊत म्हणाले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो कार्यक्रम खारघरला भर उन्हामध्ये घेतला, हजारो साधक जमले, भरून आत त्यांची व्यवस्था नव्हती त्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं. देशाचे गृहमंत्री तिथे उपस्थित होते त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला, त्यातून ती भगदड झाल्याचं म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे, महाराष्ट्र आणि हाथरसचे बळी हे अंधश्रद्धेचे बळी आहेत, त्या अंधश्रद्धेला राज्यकर्ते खतपाणी घालत असतात असा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या देशाचा पंतप्रधानाच मोठा बुवा आहे, असं म्हणत भोंदुगिरी तिथून सुरू होते तुम्ही देशाचे प्रधानमंत्री देशाच्या पंतप्रधानासारखे वागा अशी टिका संजय राऊत यांनी केली आहे. लोकं हतबल आहेत, महागाई, बेरोजगारी, गरिबी, लोकांचे प्रश्न आहेत लोक जातात भोंदू लोकांकडे, नरेंद्र मोदी यांना मिळालेली मते ही भोंदूगिरीतून मिळालेली मतं आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर टिकास्त्र डागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT