Special Summer Trains Saam Tv
Video

Indian Railway: उन्हाळी सुटीसाठी रेल्वे सज्ज! 332 अतिरिक्त गाड्यांची सोय, जाणून घ्या सविस्तर माहिती, VIDEO

Summer Special Trains: उन्हाळी सुट्टी लागताच पहिली चाहूल लागती ती म्हणजे मामाच्या गावाला जाण्याची परंतु रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची गर्दीमुळे मोठी तारांबळ उडते. मात्र यंदाचा प्रवास हा अधिक सुकर होणार आहे.

Omkar Sonawane

उन्हाळी सुटीमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 332 समर स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना दिलासा मिळावा आणि गर्दी नियंत्रणात राहावी,यासाठी रेल्वे प्रशासनाने ही विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या सुट्टीत हजारो प्रवासी आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत असतात. परिणामी रेल्वे तिकिटांवर मोठा ताण येतो आणि प्रतीक्षा यादी वाढते. ही समस्या सोडवण्यासाठी मध्य रेल्वेने अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या विशेष गाड्यांचे अधिकृत वेळापत्रक आणि बुकिंगसंबंधीची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रवाशांनी अधिकृत वेबसाइट आणि रेल्वेच्या घोषणा नियमितपणे तपासाव्यात असे आवाहन प्रशासनाने केले आहे.रेल्वेने केलेल्या या व्यवस्थेमुळे उन्हाळी सुटीत प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सुकर होईल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोन डॅशिंग महिला अधिकाऱ्यांना दिली मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT