Indian astronaut Shubhanshu Shukla reunites with his parents after safely returning from a 17-day space mission aboard the ISS. Saam Tv
Video

Shubhanshu Shukla: अभिमानाचा क्षण! १७ दिवसानंतर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले, आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू|VIDEO

Shubhanshu Shukla Space Mission Successful Return: १७ दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर शुभांशु शुक्ला यांचे पृथ्वीवर यशस्वी पुनरागमन झाले. कॅलिफोर्नियात लँडिंगनंतर त्यांच्या स्वागतासाठी आई-वडील उपस्थित होते. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते.

Omkar Sonawane

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचे आज अंतराळातील १७ दिवसांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर यशस्वी पुनरागमन झाले. स्पेस एक्सच्या यानाद्वारे त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातून पृथ्वीवर सुखरूपपणे पुनरागमन केले. हे यान कॅलिफोर्नियातील किनारपट्टीवर दुपारी तीनच्या सुमारास उतरले.

शुक्ला यांच्यासह आणखी तीन अंतराळवीर २५ जून रोजी अंतराळात गेले होते. या मोहिमेदरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात विविध वैज्ञानिक प्रयोग व निरीक्षणे केली. त्यांच्या परतीच्या प्रवासात यानाची डिलकिंग प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली, आणि संपूर्ण मिशन अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरक्षित रितीने पूर्ण झाले. पृथ्वीवर परतल्यावर शुभांशु शुक्ला यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांचे आई-वडीलही या वेळी उपस्थित होते. मुलाला पुन्हा सुरक्षित पाहून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. संपूर्ण भारतासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे. एक भारतीय अंतराळवीर म्हणून शुक्ला यांनी अंतराळात दाखवलेले धैर्य, शिस्त आणि वैज्ञानिक योगदान संपूर्ण देशाच्या गौरवात भर घालणारे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT