Ramcharitmana saam tv
Video

Indian Pakistan Tension: ...भय बिनु होइ न प्रीति, सैन्य दलाचा पाकड्यांना इशारा; प्रभू श्रीरामांची चौपाई बोलून दाखवली|VIDEO

Bhay Binu Hoi Na Preeti: भारतीय सैन्य दलाची आज पत्रकार परिषद पार पडली यावेळी यावेळी एअर मार्शल एके भारती यांनी रामचरित मानसची एक चौपाई म्हणत पाकिस्तानला सज्जड दम दिला.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर धर्म विचारत गोळ्या मारून त्यांची हत्या केली. यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्धवस्त करत शंभरपेक्षा अधिक दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. मात्र अमेरिकेने मध्यस्थी करत या युद्ध संघर्षाला विराम लावला आणि पाकिस्तानने अवघ्या काही तासातच हा विराम मोडून पुन्हा गोळीबार सुरू केला. या सर्व पार्श्वभूमीवर आज दोन्ही देशाच्या डिजीएमओमध्ये चर्चा होणार आहे. त्याआधी भारतीय लष्कराच्या तीन्ही दलाची एक महत्वपूर्ण पत्रकार परिषद झाली.

यावेळी एअर मार्शल एके भारती यांनी रामचरित मानसची एक चौपाई म्हणत पाकिस्तानला सज्जड दम दिला. ते म्हणाले, 'विनय न मानत जलधि जड़, गए तीनि दिन बीति। बोले राम सकोप तब, भय बिनु होइ न प्रीति।।' अशा शब्दात पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

Maharashtra Politics: महायुतीच्या दोन्ही दादांमध्ये जुंपली; सोन्याच्या चमचावरून अजितदादा अन् चंद्रकातदादांमध्ये जुगलबंदी

SCROLL FOR NEXT